बोदवड तालुक्यात ठाकरे गटाला पडले खिंडार

0
133

अनेक पदाधिकाऱ्यांचा ‘शिंदे’ गटात प्रवेश

साईमत/बोदवड/प्रतिनिधी :

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोदवड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बोदवड तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकारी यांनी २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून गजानन खोडके, असलम शेख, संजय महाजन, इस्राईल शेख यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे अफसर शेख, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, मुक्ताईनगरचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, बोदवडचे तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, बोदवड शहर प्रमुख गणेश टोंगे, हर्षल बडगुजर, राजेश शेठ नानवाणी, बोदवड शहरप्रमुख दिनेश माळी, बोदवडचे उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, सुनील बोरसे, विजय पाटील, राहुल शर्मा यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here