राष्ट्राच्या शाश्वत विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वाचे योगदान : डॉ. संदीप पाटील

0
19

कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे प्रा. विजय डांगे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा केली. त्यांनी समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली. देशातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनासारख्या चळवळींची आवश्यकता स्पष्ट केली.

प्रास्ताविकात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी नामदेव धुर्वे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विषद केली. स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सौरभ होनमाने, स्नेहल देसाई, नीलम कांबळे या स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ.जी.पी. देशमुख, डॉ. बी.डी.रोमाडे, डॉ. रियाज शेख, डॉ. रंगनाथ बागुल, डॉ. रमेश चौधरी, डॉ. मनीषा पालवे, डॉ. सागर बंड, प्राध्यापक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. कुशल ढाके, रासेयोच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैष्णवी केकाने तर आभार अभिलाषा पठारे हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here