Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Flower Market Do Business : पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या
    जळगाव

    Flower Market Do Business : पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 19, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपासमारीची वेळ आल्याने विक्रेत्यांचा टाहो : मनपा उपायुक्तांना दिले निवेदन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो हॉकर्स विक्रेत्यांवर १ जून २०२५ पासून जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारवाईमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत हॉकर्सचे व्यवसाय बंद पडले आहे. त्यांच्या कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पथविक्रेता समिती गठीत झाली आहे.तात्काळ कार्यान्वित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन मनपाच्या उपायुक्तांना महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियनतर्फे देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे हॉकर्स बांधवांचे व्यवसाय पूर्णपणे थांबले आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांच्या औषधोपचाराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रोजचा प्रपंच चालवणेही कठीण झाल्याने अनेक हॉकर्स अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. फुले मार्केटमधील बहुतांश हॉकर्स २५ ते ३० वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत. ते सर्व नोंदणीकृत आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची आणि पथविक्रेता समिती गठीत झाल्यामुळे हॉकर्सना फुले मार्केटमध्ये पांढरे पट्टे आखून योग्य नियोजन करून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

    हॉकर्सच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन दिलासा देण्याची अपेक्षा

    राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने हॉकर्सच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, हॉकर्सच्या कुटुंबांवर मोठ्या आर्थिक संकटाचा डोंगर कोसळण्याची भीती आहे. निवेदन देतांना अध्यक्ष नंदू वसंत पाटील, सचिव सचिन जोशी, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, पथविक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी, गोविंदा कुंभार, समाधान पाटील, रवी चौधरी, भूषण कोळी, सादिक मणियार, भैया चौधरी, कन्हैया गवळी, बबलू चौधरी, गोपी सोनार, भूषण सोनवणे, शिवम राजपूत, सचिन माळी, संदेश अलई, अनिस मणियार, गणेश जाधव, हरीश काळे, लक्ष्मण शिंदे, टेलर नाना, बापू चौधरी, पिंटू शिंदे, बापू कोळी यांच्यासह हॉकर्स बांधव उपस्थित होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.