स्वामी समर्थ मंदिरालगतच्या रस्त्यांचे कामे त्वरित करा

0
35

 

रयत सेनेची नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

शहरातील सानेगुरुजी नगरात एकमेव स्वामी समर्थांचे मंदिर आहे. मंदिरात अनेक भाविक रोज दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या पावसाळा असल्याने मंदिराकडे जाणारे दोन्ही रस्ते अत्यंत खराब आहे. तसेच प्रचंड चिखल रस्त्यावर झाल्याने भाविक भक्तांना रस्त्यावरून मार्ग काढणे जिकरीचे होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ नवीन रस्ते बांधून परिसरातील नागरिकांसह भाविकांना चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी रास्त मागणी रयत सेनेच्यावतीने नगरपरिषेचे उपमुख्याधिकारी राहुल साळुंखे यांच्याकडे नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी रयत सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, बबन पवार उपस्थित होते.

साने गुरुजी नगर परिसरातील नागरिक स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रस्ता खराब असल्याने चिखलातून मार्ग काढत जावे लागते. चिखलात वाहन घसरून पडून त्यांना गंभीर दुखापत होते.नगरपरिषदेच्यावतीने स्वामी समर्थ मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या नवीन रस्त्यांचे काम त्वरित करून भाविकांसह परिसरातील नागरिकांना रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा येत्या आठवड्याभरात नगरपरिषदेने रस्ता न केल्यास चाळीसगाव नगरपरिषदेत रयत सेनेतर्फे ‘चिखल फेको’ आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे. आंदोलनावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास चाळीसगाव मुख्याधिकारी तथा प्रशासक जबाबदार राहणार असल्याचे नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी यांना रयत सेनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेशाध्यक्ष खुशाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, मार्गदर्शक प्रा.चंद्रकांत ठाकरे, नामदेव कुमावत, गफ्फार शेख, रोहित शिंदे, बबलू अहिरे, योगेश पाटील, दिलीप भोई, मुराद पटेल, दीपक जाम, योगेश गव्हाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here