रेमंडमधील बेकायदा बडतर्फ २४ कामगार ‘त्या’ नेत्याच्या पंटरांच्या राजकारणाचे बळी

0
103

साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव

रेमंड लिमिटेड जळगाव येथील २४ कर्मचाऱ्यांना २४ फेब्रुवारी २०२३ रोजी हेतूपुरस्सर, द्वेषभावनेतून, संगनमताने जाणीवपूर्वक मनमानी आरोप करून बडतर्फ करण्यात आले. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचे पंटर या कर्मचाऱ्यांच्या जागी नेमले जावे व कामगार संघटनांवर आपला दबाव या पंटरांच्या माध्यमातून गाजवता यावा, यासाठी ही बेकायदा बडतर्फी आकाराला आल्याच्ी कामगार वर्तुळात चर्चा आहे.

ही बडतर्फी निषेधार्ह असून या कर्मचारी वर्गाचा पालन पोषण, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे १८ महिन्यापासून २४ कर्मचाऱ्यांचे परिवार रस्त्यावर आलेले आहेत त्यांची परिस्थिती खालावलेली आहे त्यामुळे अनेक राजकीय नेत्याना, मोठ्या अधिकाऱ्यांना, कंपनी व्यवस्थापनाला, कामगार संघटनेच्या अध्यक्षांना भेटून सुद्धा या कर्मचारी वर्गाला कंपनीने रुजू केलेले नाही त्यांची चुकी नसताना त्यांची प्रतिमा कर्मचारी, व्यवस्थापन क्षेत्रात मलिन करण्याचे काम करण्यात आले. हे त्यांनी अनेक वेळा लक्षात आणून देऊन देखील कंपनी व्यवस्थापन त्यांना पुन्हा रुजू करून घेत नाही आहे हा कर्मचाऱ्यांच्या न्यायिक भूमिकेचा आणि त्याना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा आहे आता हेसर्व २४ कर्मचारी परिवारासह बुधवार २४ ते २७ जुलै पर्यंत त्यांच्या हक्कासाठी, त्याना रेमंड कंपनीत पुर्ववत सामावून घेत १८ महिन्यांचा नुकसान भरपाईसह वेतनासाठी ३ दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत.
हे ३ दिवसीय शांततापूर्ण आंदोलन करणार आहे हनुमान मंदिराजवळ जळगाव औद्योगिक मंडळाच्या बोर्डाजवळ, रेमंड लिमिटेड कंपनी समोर हे आंदोलन केले जाणार आहे
कायम नोकरीमुळे अनेकांनी कर्ज काढून घरे घेतलेली आहेत. आहे त्यांचे हफ्ते फेडणे त्यांना १८ महिन्यापासून जिकरीचे झालेले आहे हे बेरोजगार कर्मचारी कुशल कामगार असूनही त्याना दर वर्षी बोनस म्हणून त्याना कंपनीकडून सन्मान मिळालेला आहे या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी १५ वर्षात रेमंड ग्रुप वाढवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे
राजकीय हस्तक्षेपामुळे कंपनी कुशल कामगारांना मुकली आहे. त्यांच्यावर व्यवस्थापनाने लावलेल्या आरोपामुळे त्यांना कंपन्या कामावर घेत नाहीत त्यांच्यामुळे अनेक वर्षांमध्ये कंपनी व्यवस्थापनाची उन्नतीच झाली आहे अधोगती कधीच झाली नाही . या कामगारांनी आपले निवेदन कामगार मंत्री व मुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे.
आंदोलनस्थळी येवून यांनी दिला पाठिंबा
शिवसेना (उबाठा) नेते माजी खा. उन्मेष पाटील, माजी महापौर जश्री महाजन , माजी महापौर ललित कोल्हे , मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, लक्ष्मण सपकाळे (लकी टेलर ), शिवसेना (उबाठा) महानगराध्यक्ष शरद तायडे, सुरज नारखेडे आदींनी आंदोलनस्थळी येवून कामगारांना पाठिबा दिला.
बडतर्फ केलेले कामगार
मयूर किसन चौधरी, चंद्रकांत पितांबर लोखंडे, अनिल भास्कर चौधरी, चेतन विनोद पाटील, संदीप पुंडलिक कोल्हे, जगदीश तुकाराम बोरोले, योगेश्वर कृष्णा कोल्हे, किशोर मुकुंदा पाटील, राहुल रमेश कोल्हे, प्रेषित मुकुंदराव महाजन, राकेश पुंडलिक कोल्हे, हर्षल वासुदेव नेहते, अमोल प्रमोद कोल्हे, प्रशांत चिंतामण धांडे , मंगल मनोहरसिंग परदेशी, राहुल धनसिंग ठाकूर, संदीप परमेश्वर चव्हाण , चंद्रकांत शंकर पाटील, मिलिंद अनिल कोल्हे, हर्षल दिलीप नारखेडे, रोहित ज्ञानदेव चोपडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here