बाळासाहेब असते तर…; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना पत्र

0
3

मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. आतापर्यंत अनेक नगरसेवक आणि नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे (Shivsena) कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. आपणपदाचा राजीनामा का दिला, याबाबत कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे.

रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना पत्र :
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळाले, असे म्हणत रामदास कदम यांनी पत्राच्या माध्यमातून आपली मनातील खदखद व्यक्त केली.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणथीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मीडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही.

मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,असे कदम पत्रात म्हणाले.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत असल्याचे कदम पत्रात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here