शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत राहील

0
6

लाडक्या बहिणींची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहून मंत्री अनिल पाटील यांनी मानले मनापासून आभार

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या’ लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांच्या मेळावा व एक हजार ७६० कोटी रुपयांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्डब्रेक गर्दी होती. कार्यक्रमात पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही कार्यक्रमाला सर्वांचा उत्साह दिसून आला. एवढ्या पावसातही तुम्ही मंडपात उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो, असे उद्गार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी काढले.

खासदार स्मिताताई वाघ यांनी ‘एकच वादा-अनिल दादा’ ही आर्त हाक आपल्या भाषणातून उपस्थितांना दिली. तालुक्याच्या विकासासाठी अनिल दादा निवडून येणे खूप गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी निम्न तापी प्रकल्प पाडळसे अंतर्गत शासकीय उपसा सिंचन बंदिस्त कूपनलिका प्रणालींसह एक हजार ७६० कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जोरदार पावसात तुम्ही मंडपात सुरक्षित आहात, मंडप वॉटरप्रूफ आहे, असा महिलांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जयश्रीताई पाटील वारंवार करत होते.

यावेळी जयश्रीताई पाटील, डॉ.दिगंबर महाले, राजश्रीताई पाटील, विक्रांत पाटील, हिरालाल पाटील, शरद सोनवणे, बचत गटाच्या सन्मानार्थी भगिनी, मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाचे चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here