मी कोणत्याही बाजूची नाही ः खा.राणा

0
12

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आज आणि उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मी कुणाच्याच बाजुची नाही, असे विधान केले आहे.

पुढील दोन दिवस संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावर राहुल गांधीही बोलतील, तुमची भूमिका काय असेल? असे विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या  की, “तुम्ही कालच राज्यसभेतील चित्र पाहिले असेल तर आकडेवारीबाबत तुम्हाला सगळे समजले असेल. एखादे विधेयक राज्यसभेत अशा आकडेवारीने पास होत असेल तर ही मोठी गोष्ट आहे. लोकसभेत तर काही प्रश्नच उरत नाही. यावरून मला काही वेळा हसू येते तर काही वेळा खूप रागही येतो. कारण मी कोणत्याही बाजुची नाही, तर मी महिलांच्या बाजुची आहे. याबाबत माझे स्पष्ट मत आहे.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणता तेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्याला धरून महिलांचा राजकारणासाठी वापर करता. यामुळे माझ्या मनाला खूप वेदना होतात. आजपासून अविश्वास प्रस्तावावर बोललं जाणार आहे. विरोधी पक्ष स्वत:च्या राजकारणासाठी लोकांचा वेळ वाया घालवत आहेत. जे लोकहिताचे विधेयक होते, त्यावरून लक्ष हटवण्याचे काम या लोकांनी केले आहे. आपल्या माहीत आहे, संबंधित प्रस्ताव लोकसभेत बहुमताने पास होणार आहे. त्याच पद्धतीने राज्यसभेतही पास होईल.विरोधी पक्षाला जर महिलांचे  एवढे महत्त्व होतं,असेल तर त्यांनी सभागृहात ९ विधेयक चर्चेविना पास होऊ दिली नसती. त्यावर चर्चा का नाही झाली? संबंधित ९ विधेयकांमध्ये संरक्षण, महिला आणि चित्रपटांशी संबंधित लोकांचे विधेयक होते. ही सर्व विधेयकं चर्चेविना पास झाली. फक्त आघाडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाने दिल्ली सेवा विधेयकामध्ये सहभाग घेतला.यातून त्यांची मानसिकता लक्षात येते,असेही नवनीत राणा म्हणाल्या. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here