Rajiv Gandhi Nagar : राजीव गांधी नगरात पतीकडून पत्नीला कोयत्याने मारहाण

0
12

रामानंदनगर पोलिसात पतीविरुध्द गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनधी :

शहरातील राजीव गांधी नगरात पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, त्याच्या रागातून लोखंडी कोयत्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात संगीता रमेश झेंडे आणि तिचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हे दोघेजण वास्तव्याला आहे. रमेश झेंडे यांनी ११ मे रोजी दुपारी दीड वाजता पत्नी संगीता यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा ते न दिल्याच्या कारणावरून पती रमेश झेंडे यांनी पत्नी संगीता यांना शिवीगाळ केली. लोखंडी कोयताने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संगीता झेंडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती रमेश झेंडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. प्रवीण जगदाळे करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here