जंगलतांडात शेकडोच्या संख्येने तरुणांनी केला भाजपात प्रवेश

0
99

भाजपाच्या नेत्यांची लाभली उपस्थिती

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

तालुक्यातील जंगलातांडा तांडा येथे भाजपाच्या जाहीर प्रवेश कार्यक्रमात जंगलातांडा येथील तरुणांसह तालुक्यातील शेकडोच्या संख्येने तरुणांनी गुरुवारी भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसज मुलतानी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे,जयप्रकाश चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष बद्री राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी मा.पं.स. सदस्य संजीवन सोनवणे, नगरसेवक राजेंद्र जावळे, रऊफ देशमुख, धनराज राठोड, दिलीप पाटील, संजय पाटील, सुनील गव्हांडे, मयूर मनगटे, सुनील ठोंबरे, मंगेश सोहनी, संजय मोरे, राहुल परदेशी, रवींद्र चव्हान, उखा चव्हाण, विष्णु पंत, पांडुरंग जाधव, आण्णा तांगडे, योगेश शिंदे, समाधान बावस्कर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here