साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
आरोपी सोबत संगमत पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भडगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या विरुद्ध राज्य मानवी हक्क न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी चे आदेश देत उतेकर यांना 50 हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महिलेची फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्या न्यायालयात खटला (४३०/२२) दाखल केला होता. याप्रकरणी निरीक्षक उतेकर यांनी कायद्याचे उल्लंघन व अभीव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवून अवमान करणे फिर्याद दाखल करण्यास नकार देणे, पदाचा दुरुपयोग करणे असे प्रकार आयोगाच्या चौकशी समोर झाले . त्यामुळे आयोगाने निरीक्षक उतेकर यांना 50 हजार रुपये दंड शिस्तभंग कारवाई आणि या प्रकरणातील आरोपी वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिले तसेच या प्रकरणात चौकशी अंतिम अर्जदाराच्या बाजूने निकाल दिला तर ५० हजार रुपये रक्कम तक्रारदाराला दोन महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहे .