पिलखोडला ‘खेळ पैठणीच्या’ कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी

0
18

मानाची पैठणी मनीषा मोरे यांनी जिंकली

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम पिलखोड येथे रंगला होता. यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सुरक्षित बहिणी कशा होतील, यासाठी उमंग सृष्टी परिवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका-अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. त्यात मनीषा मोरे यांनी ‘मानाची पैठणी’ जिंकली.

तालुक्यातील पिलखोड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सन्मान कर्तुत्वाचा खेळ पैठणीचा’ ‘जागर स्त्री शक्तीचा स्वाभिमानी बहिणींचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी परिसरातील आत्मनिर्भर, कर्तुत्ववान आणि आदर्श माता, भगिनी यांची यशोगाथा सांगितली. सूत्रसंचालन योगीता निकम तर आभार राणी कापडणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here