साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (महसुल) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नियुक्तीबाबत कोणतेही आदेश नाहीत. तथापि, आयुष प्रसाद यांच्या जागेवर पुण्याचे आर.एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. यामुळे ते देखील जळगावातून जात आहे. तर त्यांच्या जागा गडचिरोली येथील श्री अंकित या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.