How Will The ‘Nationalist’ : बदलत्या राजकीय समिकरणांचा ‘राष्ट्रवादी’ जिल्ह्यात कसा लाभ उठविणार ? त्याचीच लागली उत्सुकता…!

0
29

स्थानिक निवडणुका… वेध राजकीय स्थितीचा…!

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

सध्याच्या राजकारणात काही नेते मंडळी स्वत:च्या राजकीय सोयीनुसार पक्षीय भूमिका बदलतात, पण या नेत्यांप्रमाणे त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिकाही बदलते का…? आणि बदलत असेल तर त्याचे प्रमाण किती…? हा खरा प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते आणि रा.काँ.चे सर्वेसर्वा अर्थात संस्थापक शरद पवार यांचा ‘राष्ट्रवादी’ पक्ष शिवसेनेप्रमाणेच दुभंगला गेला आहे. त्यातून दोन गट निर्माण झाले आहेत. पण पक्षातील फुटीने काही नवीन राजकीय समिकरणे निर्माण होऊ पाहत आहेत. मूळ ‘राष्ट्रवादी’ पक्षातील फुटीमुळे दोन गट निर्माण झाले एक ‘शरद पवार’ आणि दुसरा उपमुख्यमंत्री ‘अजित पवार’ गट या दोन्ही गटाची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती फारशी वेगळी नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा फार मोठा गट या पक्षात गेल्या विधानसभा निवडणुकीत नव्हता. मात्र, निवडणुकीनंतर शरद पवार गट प्रणित राष्ट्रवादी गटातून अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारत काहींनी प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गटाची राजकीय शक्ती सध्या वाढली आहे.

गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादीने (अजित पवार गट) जिंकल्यानंतर पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यातही काहींनी पद, प्रतिष्ठेसाठी अजित पवारांसोबत जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. आता अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातील महायुतीचा घटक पक्ष (मित्र पक्ष) गणला जात आहे. साहजिकच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती अंतर्गंत राजकीय लाभ कसा उचलता येतो, यावर या पक्षात मंथन सुरु असण्याची शक्यता आहे. तथापि, स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा विचार करता प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती खूप भिन्न आहे.

पक्षीय प्रभावाचे ‘गणित’ उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अवलंबून

जळगाव महानगरपालिकेचे उदाहरण द्यायचे झाल्यास जळगाव मनपा क्षेत्रात या पक्षाचे नेटवर्क अथवा प्रभावक्षेत्र कोणते…? हाही प्रश्न आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा लोकसंपर्क जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीणमध्ये चांगला असला तरी त्या तुलनेत धडाडीचे कार्यकर्ते किती…? अमळनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांना मानणारे समाजाचे विविध घटक आणि त्यांनी मंत्री पदावर असतांना केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे तर उर्वरित तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार कसे कामाला लावतात…?, यावरच त्यांच्या पक्षीय प्रभावाचे ‘गणित’ अवलंबून असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here