Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»बारावी परीक्षेत यंदा मुलींचा टक्का किती वाढला? राज्यात कोणत्या विभागाचा निकाल घटला ; जाणून घ्या
    शैक्षणिक

    बारावी परीक्षेत यंदा मुलींचा टक्का किती वाढला? राज्यात कोणत्या विभागाचा निकाल घटला ; जाणून घ्या

    SaimatBy SaimatMay 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत पुणे प्रतिनिधी

    राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजेनंतर पाहता आला. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून 12 लाखांवर विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच त्यांची प्रिंट घेता येईल.

    कोणत्या विभागाचा किती निकाल

    कोकण विभाग – सर्वाधिक 96.01 टक्के
    मुंबई विभाग – सर्वात कमी 88.13 टक्के
    पुणे विभाग – 93.34 टक्के
    नागपूर विभाग – 90.35 टक्के
    औरंगाबाद विभाग – 91.85टक्के
    कोल्हापूर विभाग – 93.28 टक्के
    अमरावती विभाग – 92.75 टक्के
    नाशिक विभाग – 91.66 टक्के
    लातूर विभाग – 90.37 टक्के
    मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त

    राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त लागला आहे.

    23 विषयांचा निकाल 100 टक्के
    154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीची परीक्षा एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Maharashtra Government :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

    March 15, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.