BJP YMCA? : ‘भाजयुमो’च्या प्रदेश सचिव पदावरुन हकालपट्टी होऊनही अमित सोळुंके पक्षात सक्रीय कसा…?

0
13

भाजपचे आ. प्रसाद लाड यांचे ‘लेटरहेड’ गैरवापर प्रकरण  

जळगाव/विशेष प्रतिनिधी :

भाजपचे विधान परिषद सदस्य आ.प्रसाद लाड यांच्या ‘लेटरहेडचा’ गैरवापर करुन ३.४० कोटीच्या निधीचा अपहाराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण राज्यभरात सध्या गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंकेच्या विरोधात २ जुलै रोजी एफआयआर दाखल आहे. अमित सोळुंके हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश सचिव म्हणून कार्यरत होता. तथापि, आ.लाड यांच्या ‘लेटरहेडचा’ गैरवापर केल्याचे प्रकरण समोर येताच सोळुंकेची पक्षाच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी १९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये त्याला पदमुक्त केल्याचे म्हटले आहे. किंबहुना तसे पत्र जारी केले गेले. त्यात पक्षविरोधी कार्य, पक्षाची नितीमूल्ये, शिस्तविरुध्द वर्तन केल्यामुळे सोळुंकेला पदमुक्त केल्याचे म्हटले आहे.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केलेल्या कारवाईची तारीख १९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे आणि सोळुंके विरोधात एफआयआर २ जुलै २०२५ रोजी दाखल केली आहे. तात्पर्य सोळुंके १९ ऑगस्ट २०२४ पासून पक्षात नाही किंवा पक्षात कार्यरत राहण्याचा प्रश्नच येत नाही, असे असतांना १० सप्टेंबर २०२४ रोजी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष मोरे यांच्यासोबत, जळगावमध्ये ७ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवार गिरीष महाजन यांच्या प्रचार रॅलीत जामनेरमध्ये सोळुंके सहभागी होता. एखाद्या पदाधिकाऱ्यास गंभीर आरोप किंवा संशयावरुन पद व पक्षातून काढून टाकल्यानंतर त्याचा पक्षात सक्रीय सहभाग कसा असू शकतो…? २ जून २०२५ रोजी तर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासोबत जळगावच्या जी.एम.फाउंडेशनमध्ये चर्चा करतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षांनी सोळुंकेला पदावरुन काढले की, कागदोपत्री काढल्याचा बनाव केला…? असे प्रश्न आता या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here