Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू
    Uncategorized

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    saimatBy saimatApril 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिंधुदुर्ग हादरला; जीवावर उदार होऊन बचावकार्य, परिसरात हळहळ

    साईमत / सिंधुदुर्ग 

    करूळ घाट येथे सिमेंटने भरलेला ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात विजापूर येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

    अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, करूळ परिसरातील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

    या बचावकार्यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, सह्याद्री जीवरक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीचा हात दिला.

    या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Black Magic : काळी बाहुली व रिंगणाने भीतीचे वातावरण; जावयाच्या कृत्याने सासरच्या घरासमोर खळबळ

    April 1, 2026

    Nanded : शिवव्याख्याते मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघाती मृत्यू

    April 1, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.