साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा आणि जळगाव नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त चोपडा तालुका व शहरातील विविध शाळा व महाविद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शुभेच्छापत्र देवून सन्मान केला.
उपक्रमांतर्गत शहरातील समाजकार्य महाविद्यालय, पंकज विद्यालय, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय, विवेकांद विद्यालय, प्रताप विद्या मंदिर व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, निमगव्हाण व चौगाव, जय श्री दादाजी हायस्कूल, तांदलवाडी येथे कार्यरत व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा ९० शिक्षकांना शुभेच्छापत्र देवून शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचे आयोजक तथा रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, सचिव गौरव जैन, खजिनदार मयूरेश जैन, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य प्रा. दिव्यांक सावंत, भरत राजपुरोहित, अरूण भोई, हेमांशू पाटील, अजय शिरसाठ, डिगंबर धनगर, राहुल कोळी आदींनी शिक्षकांचे स्वागत केले.