ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम शाळेतील गुणवंतांचा गुणगौरव

0
61

साईमत, चोपडा ः प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुलच्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.

पूर्वी पवन अग्रवाल ही विद्यार्थिनी ९४ टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आली आहे. दिव्य हितेश जैन (९१.६०), राजवीर प्रशांत पाटील (९१.२०), स्पंदन उत्तम सोनकांबळे (९०.४०), सेजल अजय कासट (८७.४०), रोहित किशोर मराठे (८७), प्रियांशू खंडेराव पाटील (८६.४), मोहित भागवत पाटील (८६.४), मनीष भिकन शिरसाठ (८६.२), अक्षय संदीप पाटील (८४.८), देवांशू मनोज पाटील (८३.८), मंदाश्री चंद्रकांत पाटील (८२.८), हर्षदा प्रवीण बोरसे (८०.४) आणि रिद्धिमा विजय सोनवणे (८०.२) आदी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, शाळा समन्वयक निळकंठ सोनवणे, प्रा. दीनानाथ पाटील, विलास दारूंटे, मुख्याध्यापिका ममता न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल आदींच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मोहित भागवत पाटील या विद्यार्थ्याने संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले. त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता न्याती, अमन पटेल, दीप्ती पाटील, विशाखा बडगुजर, जगदीश पाटील, वैभव मराठे, विशाल मराठे, शकील अहमद, भूषण बडगुजर आणि दीपाली पाटील आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पूर्वी पवन अग्रवाल या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. उत्तम सोनकांबळे, प्रेमलता इंदरचंद टाटीया यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तथा आभार अमन पटेल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here