साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक पुरस्कार’ ब्राम्हणशेवगे येथील माध्यमिक शाळेचे उपक्रमशिल शिक्षक वाय.टी.पाटील यांना धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरस्कारासाठी राज्यातून ४४ जण मानकरी ठरले होते. त्यात त्यांचाही समावेश होता.
हा पुरस्कार नाशिक विभागाचे शिक्षक आ.सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्राम्हणशेवगे पंचक्रोशीतून वाय.टी.पाटील यांचे कौतुक होत आहे.