साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच आणि शिवशाही फाउंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी साने गुरुजी नूतन विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारवड हायस्कुलचे निवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील, तालुका विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष तथा पिंपळे हायस्कुलचे विज्ञान शिक्षक जे.एस.पाटील, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, ग.स. पतपेढीचे माजी संचालक वाल्मिक पाटील, बाजार समितीचे माजी संचालक डी.ए.धनगर आदी उपस्थित होते.
काटे पॅलेसमधील शिवशाही फाउंडेशनच्या कार्यालयात गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त उमेश काटे, राष्ट्रीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार प्राप्त निरंजन पेंढारे, बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ईश्वर महाजन, मौलाना अबुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ए.बी.धनगर, महात्मा फुले पुरस्कार प्राप्त शरद पाटील, नेट परीक्षा उत्तीर्ण प्रदीप कंखरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचचे ज्येष्ठ सदस्य रामकृष्ण बाविस्कर, रत्नाकर पाटील, सुनिता पाटील, दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, रवींद्र पाटील, गणेश बोढरे, विलास पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल हडपे, विशाल देशमुख, बापूराव ठाकरे, सुधीर चौधरी, वेदांत सोनवणे, शाहूराजे काटे आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, मंचचे समन्वयक दत्तात्रय सोनवणे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.कुणाल पवार तर आभार डी.ए.धनगर यांनी मानले.