सोहळ्यात विद्यार्थ्यांना मिळणार यशाचे सुवर्ण ‘सन्मानचिन्ह’
जळगाव/साईमत/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसच्या मागे, जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. मुनिश्री १०८ आस्तिक्य सागर महाराज व प.पू. मुनिश्री १०८ विनियोग सागर महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि छत्रछायेखाली कार्यक्रम होईल. गुणगौरव सोहळ्यात जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, उद्योगपती अशोकभाऊ जैन, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णु भंगाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र नारळे, किड्स गुरुकुलच्या प्राचार्य मीनल जैन तसेच समाजातील प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड, निर्मल चांदीवाल, अजित कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत.
समाज बांधवांना प्रवचनातून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार
कार्यक्रमानंतर प.पू. मुनिश्री आस्तिक्य सागर महाराज व मुनिश्री विनियोग सागर महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे समाज बांधवांना अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे. यशस्वीतेसाठी दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळाचे पदाधिकारी गणेश डेरेकर, महावीर सैतवाल, दीपक फुलमोगरे, धन्यकुमार जैन, विश्वनाथ चतुर, दीपक जैन, अजय सूर्यवंशी तसेच दिगंबर जैन महिला मंडळाच्या पदाधिकारी महिला वर्ग प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाला समाज बांधवांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.