साईमत, यावल : प्रतिनिधी
भारत सरकारच्या जळगाव येथील आकाशवाणी केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या निवडक लोकांचा सन्मान आयोजित केला होता. त्यात यावल तालुक्यातील शिरसाडचे ग्रामपंचायत सदस्य, यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ग्रामसत्ता संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तेजस धनंजय पाटील यांचा गौरव केला. गेल्या १० वर्षापासून तेजस पाटील हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. विविध संघर्षातून ते कायम यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून हा सन्मान केल्याचे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, आ.राजुमामा भोळे, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकी पाटील, जळगाव मनपाच्या नगरसेविका ॲड.शुचिता हाडा, डॉ.विश्वास पाटील यांच्यासह मान्यवर, सन्मानार्थी, श्रोते उपस्थित होते.
