Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळचे सुपुत्र शहीद नरेंद्र महाजन यांना ‘मानवंदना’
    भुसावळ

    भुसावळचे सुपुत्र शहीद नरेंद्र महाजन यांना ‘मानवंदना’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हौतात्म्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे

    साईमत/भुसावळ/प्रतिनिधी:

    दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणारे भुसावळचे सुपुत्र शहीद नरेंद्र ओंकार महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त सीआरपीएफ आणि त्यांच्या मित्रमंडळाच्यावतीने त्यांच्या स्मारकाला नुकतीच ‘मानवंदना’ देण्यात आली. हा कार्यक्रम भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पुढाकार घेऊन पार पाडला. कार्यक्रमाला सीआरपीएफच्या पुणे येथील मुख्यालयातील एक खास पथक भुसावळात आले होते. त्यांच्या मानवंदनेसह कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    भुसावळातल्या विद्यानगर भागातील रहिवासी नरेंद्र ओंकार पाटील हे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. ११ ऑगस्ट १९९९ रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ शहरातील रेडिओ केंद्राच्या संरक्षणात तैनात असतांना येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात प्रतिकार करतांना नरेंद्र महाजन यांना वीरमरण प्राप्त झाले. दरम्यान, नरेंद्र महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विद्यानगर मित्र मंडळासह परिसरातील त्यांच्या सर्व मित्रांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    प्रारंभी शहीद नरेंद्र महाजन यांच्या अर्धांगिनी श्रीमती अर्चना नरेंद्र महाजन, त्यांच्या भगिनी व आप्तस्वकीय तसेच पुण्याहून आलेल्या सीआरपीएफच्या पथकातील एसआय जी.डी.एस.पी धुमाळ, अनिल भोवते, राहुल निकम आदी मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी ‘शहीद नरेंद्र महाजन अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यानंतर शहीद नरेंद्र महाजन यांच्या स्मारकाला वंदन करून अभिवादन करण्यात आले.

    वेडीमाता मंदिराजवळ मोठा कार्यक्रम घेणार

    याप्रसंगी आ.संजय सावकारे, भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, दिनेश भंगाळे यांच्यासह सीआरपीएफच्या पथकातील एसआय जी.डी.एस.पी.धुमाळ, अनिल भोवते, शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शहीद नरेंद्र महाजन यांचे सुपुत्र स्वराज महाजन हे मर्चंट नेव्हीत कार्यरत आहे. सध्या जहाजावर असल्याने ते घरी परतल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विद्यानगरातील वेडीमाता मंदिराजवळ मोठा कार्यक्रम घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

    यांची लाभली उपस्थिती

    कार्यक्रमाला शहीद नरेंद्र महाजन यांच्या कुटुंबियांसह माजी नगरसेवक मुकेश पाटील, पत्रकार शेखर पाटील, किशोर आसोदेकर, पत्रकार राकेश कोल्हे, हेमंत चौधरी, राजेश नेमाडे, राकेश चौधरी, विलास चौधरी, प्रमोद शुक्ला आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    स्थानिक प्रशासनाकडून कार्यक्रम न घेतल्याने संताप

    शहीद नरेंद्र महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असतांना स्थानिक प्रशासनाच्यावतीने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन तर दूरच पण त्यांना अभिवादन करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका वा अन्य कोणत्याही खात्याचे अधिकारी न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मारकाचे नूतनीकरणही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.