साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
येथून जवळील वेल्हाळे गावात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व्यसनमुक्तीची होळी साजरी करण्यात आली. त्यामुळे वेल्हाळे गावातील होळीचा सण चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात वेल्हाळेचे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस चंद्रकांत चौधरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य डॉ.दयाघन राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी काही शासकीय योजनांची माहिती दिली. वेल्हाळे येथील सरपंच शारदा कोल्हे, भुसावळ येथील प्रख्यात समुपदेशक आरती चौधरी तसेच व्यसनमुक्ती केंद्र संचालक डॉ. वंदना वाघचौरे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. याप्रसंगी सरपंच शारदा कोल्हे, उपसरपंच हेमंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तिका देवून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यशस्वीतेसाठी भुसावळ रोटरी क्लबचे सदस्य सारंग चौधरी, आकाश कुरकुरे, गणेश पाटील, सचिन सुरवाडे, राजु राणे, सतीश पहेलवान, चेतन पाटील, सचिन पाटील, शशिकांत पाटील, दिनेश पाटील, उमाकांत पाटील, पुरूषोत्तम पाटील, निखिल पाटील, पंकज पाटील आदींनी परिश्रम घेतले.