साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करता येत नाही. पण ३ जिल्ह्याच्या १४ गड किल्ल्यांवर शासनाने शौचालय बांधायचा जी.आर. काढला आहे. त्यामुळे शिवभक्तामध्ये या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. १४ भुईकोट गट किल्ल्यांवर शौचालय बांधण्याचा शासनाने काढलेला जी.आर. तात्काळ मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर जी.आर.ची शिवभक्तांच्यावतीने शनिवारी, २३ रोजी होळी करण्यात आली.
शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी.आर. तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यातील शिवभक्त आक्रमक आंदोलन करतील, याची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी.आर. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यातील शिवभक्त राज्यभर आक्रमक आंदोलन करतील, असा इशारा शासनाला चाळीसगाव येथील शिवभक्तांनी दिला आहे.
आंदोलनात गणेश पवार, खुशाल पाटील, विजय (पप्पू) पाटील, मनोज भोसले, किशोर पाटील, विलास मराठे, भरत नवले, तमाल देशमुख, दिनेश गायकवाड, मुकुंद पवार, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हे, सतीश पवार, दीपक देशमुख, अनिल कोल्हे, छोटू अहिरे, पी.एन.पाटील, आर.बी.जगताप, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर शिंदे, विलास गवळी, दिलीप पाटील, विलास भोसले, प्रमोद वाघ, सुनील देशमुख, सचिन गायकवाड, ईश्वर पवार, गणेश गोसावी, दीपक नागणे, संजय चित्ते, किरण पवार, दत्तु पवार, योगेश पवार, विकास पवार, अण्णासाहेब धुमाळ, योगेश देशमुख, सचिन पवार, मनोज देशमुख, संजय पाटील, सोनाली लोखंडे आदी सहभागी झाले होते.