साईमत यावल प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेत विषय समितीच्या सभापतींची निवड दि. १९ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीच्या तिन समित्यांना सभापतीपद मिळाले, तर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (अप) गटाने एकत्र येऊन २ सभापतीपदांची संधी मिळवली.
नगरपरिषदेच्या सभेत पिठासीन अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी निशीकांत गवई आणि सह मुख्याधिकारी रविकांत डांगे उपस्थित होते. याशिवाय नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील आणि उपनगराध्यक्ष सईदा बी याकुब शेख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
सभापती निवडीचे महत्त्वाचे निर्णय
-
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांची निवड झाली, ज्या गटाचे सहा पैकी चार सदस्य असल्यामुळे त्यांचे वर्चस्व राहणार आहे.
-
उपनगराध्यक्ष सईदा बी शेख यांची निवड स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी झाली.
-
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती इमाम खान समिर खान झाले.
-
शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती पराग विजय सराफ.
-
बांधकाम नियोजन व विकास समितीचे सभापती राष्ट्रवादी (अप) अंजुम बी कदीर खान.
-
महिला व बालकल्याण समितीचे सभापती राष्ट्रवादी (अप) अमिनाबी शाकीर खान.
सभापती निवडी नंतर, नवनियुक्त सभापतींनी शहरातील विविध प्रलंबित विकासकामे व समस्यांचे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांच्या हितासाठी ही समिती पुढील काळात सुरळीत कामकाज आणि प्रगती सुनिश्चित करेल, अशी आशा आहे.
