Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा सेवेत रुजू होईल-आ.खडसे
    मुंबई

    प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा सेवेत रुजू होईल-आ.खडसे

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांना चार दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. हे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा एअर ॲम्ब्युलन्सद्वारे आ.खडसेंना तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.आ.खडसे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
    ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये एकनाथ खडसे म्हणाले, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते.आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”
    ४ दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते पण खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री त्यांना हवाई ॲम्ब्युलन्सने मुंबईलला आणण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा सेवेत रुजू होईन, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Asha Bhosle : सुरांची मलिका हरपली आशा भोसले यांचा अखेरचा निरोप

    April 12, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.