साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेतर्फे अखिल भारतीय राजभाषा हिंदी विभूषण, हिंदी विशारद, हिंदी रत्न परीक्षा देवगाव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे घेण्यात आली. देवगाव देवळी येथील महात्मा फुले स्कूलमध्ये आठवी, नववी व दहावीचे ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा शांततापूर्ण वातावरणामध्ये घेण्यात आली.
महात्मा फुले स्कूल येथे हिंदी राष्ट्रभाषा यांच्यामार्फत परीक्षेला गेल्या बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना बसविण्यात येत होते. या वर्षापासून महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्यामार्फत परीक्षेला बसविण्यात आले आहे. परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे व सन्मानपत्र महात्मा गांधी राजभाषा प्रचार संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हिंदी परीक्षेला मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मार्गदर्शन केले. हिंदी विषय प्रमुख व परीक्षेचे आयोजन ईश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करून तणावमुक्त परीक्षा कशी देता येईल, यासंदर्भात माहिती दिली.
हिंदी परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी, एस.के.महाजन, क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी सहकार्य केले.