नूतन मराठा महाविद्यालयात हिंदी भाषा सप्ताह साजरा

0
32

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील नूतन मराठा महाविद्यालयात हिंदी भाषा सप्ताहाचे आयोजन केले होते. समारोप सुप्रसिद्ध हिंदी गझल समीक्षक डॉ. मधु खराटे यांच्या उपस्थितीत तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. राहुल संदानशिव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय डॉ.आफाक शेख यांनी करुन दिला तर कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका डॉ.राहुल संदानशिव यांनी प्रास्ताविकात नमुद केली. अर्जुन परदेशी या विद्यार्थ्यांने आठवड्याभरात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा यांचा आढावा आपल्या मनोगतात व्यक्त केला. आदिती वाणी या विद्यार्थिनीने गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या साहित्यिक मेजवानीचा अनुभव मनोगतातून कथन केला.

डॉ.मधू खराटे यांनी “गझल आकर्षित करती है, हम अपने आप को ढुंढते है ! मै गझल सुनाकर चुपचाप अलग खडा हो गया, लोग अपने चाहने वालों को ढुंढने मे खो गये ! अशी गझलची आपलेपणा दाखविणारी ओळख करून दिली. गझल सर्व सामान्यांचा हुंकार आहे असं सांगताना त्यांनी “उॅची उॅची इमारतोसे घीर गया मका मेरा ! लोग मेरे हिस्से का सुरज भी खा गये ! या शिवाय, ” यहा तक आते आते सुख जाती है नदिया, हमे मालूम है पाणी कहा ठहरा हुआ है ! असा सनसनाटी प्रश्न उपस्थित करणाऱ्या रचनांसोबतच धार्मिकतेवर प्रहार करताना ” पिताजीने बस्ते मे रखी जो किताब मजहब की, मैने कहा पिताजी निकालो वरना मेरी बस्ते की सब किताबे जल जायेगी ! या अशा अनेक गजलांसह डॉ.मधू खराटे यांनी कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक बक्षीस देऊन गौरव

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एल.पी.देशमुख यांनी अर्थपुर्णता हा हिंदी गझलेचा विशेष असून प्रत्येक गजलेची एक वेगळी ओळख रसिकांना नेहमीच चिंब भिजवताना दिसते, असं सांगून स्पर्धेत सहभागी तसेच विजेते विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सप्ताह दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात विजयी विद्यार्थ्यांना पुस्तकं बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सुत्रसंचलन प्रा.मुक्ती जैन तर आभार प्रा. तेजस्विनी पाटील यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

विविध स्पर्धांचा निकाल असा

विविध स्पर्धेतील निकालातील विजेत्यांमध्ये काव्य वाचनात प्रथम प्रियंका अशोक सोनवणे, द्वितीय शुभांगी भरत सपकाळे
तृतीय नयना डिगंबर कोळी, वक्तृत्वमध्ये प्रथम आदिती विजय वाणी, द्वितीय माधवी ज्ञानेश्वर सोनवणे, तृतीय भावना आशुतोष शुक्ला, चित्रकलामध्ये प्रथम आदिती विजय वाणी, द्वितीय- रेवती कैलास बाविस्कर, तृतीय विभागून वैभव नाना अडकमोल आणि हर्षिता दिनकर पाटील, निबंधमध्ये प्रथम माधवी प्रेमनाथ सोनवणे, द्वितीय आदिती विजय वाणी, तृतीय साक्षी बालकृष्ण काटे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here