साईमत जळगाव प्रतिनिधी
नंदिनीबाई ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. १३ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदा व नंदिनीबाई जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला निबंधासाठी हिंदी रोजी रोटी का जरिया व संत कबीर सच्चे समाज सुधारक हे विषय होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य सी. एस. पाटील, उपप्राचार्य एस. एस. नेमाडे, समन्वयक प्रा.आर .डी .वराडे, प्रा. डी. यू राठोड, प्रा.डी .एम .बारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्ही एम जोगी यांनी केले तर हिंदी दिना विषयी प्रा. स्वाती पाटील यांनी माहिती सांगितली, तसेच, प्रा. ज्योती कापुरे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बँक ऑफ बडोदाचे राजभाषा अधिकारी शिवम कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक व्ही. एम.जोगी, प्रा. ज्योती कापुरे, प्रा. लेखा नारखेडे, प्रा. स्वाती पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.