साईमात : जळगाव : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका संगीता तळले, स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रमुख वंदना पाटील, मेघा घोरपडे , ज्योती देशमुख या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वेदिका नारखेडे, समृद्धी हलनोर, स्वरा पाटील यांनी केले. हिंदी दिनाचे महत्त्व रिद्धी नगरकर, अंशिता महिरे या विद्यार्थिनीनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हिंदी गीत सादर केले. त्यानंतर हिंदी साहित्यकांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी काही विद्यार्थी संत तुलशीदास,संत कबीरदास मुंशी प्रेमचंद, महादेवी वर्मा अशा हिंदी साहित्यिकांच्या भूमिकेत आले होते.
दरम्यान, ३री, ४थी, आणि ५वी साठी – हिन्दी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता पठण आणि कथाकथन या स्पर्धा घेण्यात आले परीक्षक म्हणून शानबाग विद्यालयाचे समन्वयक राजेंद्र पाटील, अतुल मनोहर , कविता सूर्यवंशी हे होते.