साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी .आर्ट्स एस. एम.ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय येथे शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला. याप्रसंगी प्रमुख वक्ता तथा मार्गदर्शक म्हणून एम .एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्रा. डॉ. जिजाबराव व्ही. पाटील यांनी ‘हिंदी भाषेचे महत्त्व आणि उपयोगिता’ यावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर होते. त्यांनी हिंदी भाषा व्यापार, व्यवहार व दैनंदिन जीवनात कशी प्रचलित झाली, याविषयी माहिती दिली. याप्रसंगी उपप्राचार्य डी.एल.वसईकर, डॉ. के. एस. खापर्डे, डॉ.अजय व्ही.काटे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सृष्टी पाटील, तनुश्री पाटील, दिव्या पाटील, प्रेरणा माळी, रिजवाना पिंजारी, रीना वानखेडे या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सौ.नयना पाटील यांनी करून आभारही मानले. प्रास्ताविक हिंदी विभागाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनीता कावळे यांनी केले.