तेलंगणात वायुसेनेचे विमान कोसळताच भीषण आग : दोन वैमानिक गंभीर जखमी

0
48

हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणात आज मोठा अपघात घडला आहे. वायुसेनेचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत विमान कोसळताच विमानाला आग लागली.
तेलंगणातील हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान सकाळी ८.५५ च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एक कॅडेटचा समावेश आहे.
हैदराबाद येथे ७ प्रशिक्षण विमान कोसळले. या विमानात दोघेजण होते. एकजण प्रशिक्षक आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक त्यात होते. विमान कोसळताच विमानाला आग लागली. त्यामुळे हे विमान जळून खाक झाले. दरम्यान, या विमानाला लागलेली आग विझवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली तसेच, या अपघातात दोघे जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या अपघाताप्रकरणी शोध प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच या अपघाताचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here