Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : उष्णतेचा तडाखा; दोन दिवसांत पारा ५ अंशांनी वाढून ४१ वर, नागरिक त्रस्त
    जळगाव

    Jalgaon : उष्णतेचा तडाखा; दोन दिवसांत पारा ५ अंशांनी वाढून ४१ वर, नागरिक त्रस्त

    saimatBy saimatApril 12, 2026Updated:April 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुपारच्या वेळेत रस्ते ओस; उकाड्यात वाढ, हवामान खात्याने आणखी तापमान वाढीचा इशारा

    साईमत / जळगाव

    एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्यात उष्णतेने आपला कडाका वाढवला असून शहराने पुन्हा एकदा ‘हॉट शहर’ अशी ओळख ठळक केली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ होऊन पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

    आठवड्याच्या सुरुवातीला तुलनेने सौम्य असलेली उष्णता आता प्रचंड तीव्र झाली आहे. गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र अवघ्या ४८ तासांतच तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी ते ४१ अंशांवर पोहोचले. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत.

    सकाळी १० वाजल्यानंतरच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत मुख्य बाजारपेठा आणि रस्ते पूर्णतः ओस पडत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, उसाचा रस आणि विविध शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत.

    दरम्यान, रात्रीच्या तापमानातही वाढ नोंदवली जात आहे. ९ व १० एप्रिल रोजी किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस होते, तर ते ११ एप्रिल रोजी वाढून २१.५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळीही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून जळगावकरांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

    April 12, 2026

    Jalgaon : शहर सुशोभीकरणाला नवे रूप महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगावात रस्ते मार्किंगला वेग

    April 12, 2026

    Bhusawal : तळवेल शिवारात अग्नितांडव; आईच्या धाडसाने दोन चिमुकल्यांचे प्राण वाचले

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.