जळगाव : प्रतिनिधी
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी एकाच दिवसात तब्बल 17 एन्जिओग्राफी व 8 रुग्णांवर मोफत एन्जिओप्लास्टी एन्जिओप्लास्टी केल्यात, यामुळे मोफत हृदयविकार निदान व उपचार अभियानातील रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
गोदावरी फाऊंडेशनतर्फे मलकापूर, नांदुरा गावात मोफत हृदयविकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरस्थळीच रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, ईसीजी कार्डिओग्राफ तपासणी मोफत करण्यात आली. ईसीजी खराब आलेल्या रुग्णांची टू डी इको तपासणीही नि:शुल्क करण्यात आली असून त्यातून हृदयविकाराची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्यासाठी वाहनव्यवस्थाही फाऊंडेशनने करुन दिली होती. त्यानुसार तातडीने एन्जीओग्राफीची गरज असलेल्या 17 रुग्णांना पहिल्या टप्पयात रुग्णालयात आणण्यात आले असून एकाच दिवसात निष्णात तज्ञांनी रुग्णांची एन्जीओग्राफी केली. त्यातून 8 रूग्णांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणार्या नसांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आल्याने तात्काळ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत मोफत एन्जिओप्लास्टी देखिल करण्यात आली.
नांदूरा येथे घेण्यात आलेल्या हृदयविकार शिबिराचा अनेक हृदयविकारी रुग्णांना लाभ झाला असून रुग्णांना रुग्णालयात आणणे, राहण्याची, भोजनाची चोख व्यवस्थाही करण्यात आली. याशिवाय महत्वाचे तात्काळ तपासण्या करुन एन्जीओग्राफीसह गरजेनुसार एन्जीओप्लास्टीही यावेळी करण्यात आली तसेच रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांच्याद्वारे मिळालेली चांगल्या वागणुकीमुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
डीएम कार्डियोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रेसिडेंट डॉ.तेजस कोटेचा, डॉ.हेत्वी वैद्य, डॉ.संग्राम वाघ, डॉ.अंकुश विश्वकर्मा, डॉ.ज्योती वर्मा, डॉ.कौस्तुभ विभुते, बीएचएमएस इंटर्न डॉ.रोहिता, डॉ.प्रभासिनी सोनवणे, डॉ.कमलेश सोनवणे यांच्यासह नर्सिंग स्टाफचे जुनेद मुस्तफा गवळी, अल्ताफ मौसमी, स्टाफ नर्स गोल्डी सावले, दिपाली भारंबे, स्टाफ नर्स मेरी जैन, यांनी रुग्णांची सेवा सुश्रृषा केली. एन्जीओग्राफी, एन्जोप्लास्टीसाठी टेक्निशियन तेजस तळेले, सुधाकर, अमोल पाटील, कुंदन भंगाळे तसेच नावनोंदणी प्रक्रियेसाठी डिंपल, गौरख, छोटू कोळी, मार्केटिंगचे रत्नशेखर जैन यांचे सहकार्य लागले.
नांदूरा येथील प्रमिला सावकारे (60), सुशिलाबाई विटे (65), मंदा सोनटक्के (50), अशोक राऊत (62), रामदास सावकारे (65), वासुदेव मांगटाणी (73), विलास इंगळे (52), भानुदास थिते (55), सुपडा गागोल (59), इंदुमती झगडे (58), बद्रीविशाल वाये (71), संजय सुपे (52), त्र्यंबक चिकटे (65), दादा राव (55) आदि रुग्णांची एन्जीओग्राफी करण्यात आली.