नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे.याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलेही आहे.त्यामुळे सोमवारी (३० ऑक्टोबर) सर्वेोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर रविवारी (२९ ऑक्टोबर) दिल्ली दौऱ्यावर आले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी या दौऱ्याचे कारण सांगितले.
राहुल नार्वेकर म्हणाले की, “दिल्लीत माझ्या काही भेटीगाठी आहेत तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबरही माझी बैठक होणार आहे.