साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ व जामनेर उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत शालेय ५ वी ते १२ वीच्या उपस्थित विद्यार्थ्यांची नुकतीच आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यात डॉ.पंकज पाटील, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.अनिता राठोड, डॉ. विजया पाटील, डॉ.धनंजय पाटील या सर्व टीमने ८४८ विद्यार्थ्यांची तपासणी करून १२० विद्यार्थ्यांना औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.