साईमात : जळगाव : प्रतिनिधी
जळगाव खुर्द येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात आयुष्मान भव मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन साथरोग बाबत माहिती देत जनजागृती करण्यात आली.
यावेळी सांसर्गिक आजार सर्वेक्षण (कुष्ठ आणि क्षय रोग) तसेच असंसर्गिक आजार तपासणी (HTN,DM,CA) संशयित तपासणी, गर्भवती माता तपासणी, आदी सर्व लाभार्थी यांची आरोग्य तपासणी व ई संजीवनी (Teleconsultation) करण्यात आली व वेलनेस ॲक्टिविटी अंतर्गत साथरोग (थंडी ताप,मलेरिया,डेंग्यू ,हगवण) विषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी ग्रामस्थउपस्थित होते. अभियान यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्याधिकारी डॉ. तुषार राणे, आरोग्यसेविका प्रेमलता पाटील, आशासेविका सुलभा पाटील, आशा कोल्हे, योगिता राणे, चंदा मगरे आदींनी परिश्रम घेतले.