साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून सादर झालेल्या ‘कृष्ण आराधना’कार्यक्रमात कृष्ण लिलेचे विविध प्रसंग कथ्थक नृत्याद्वारे सादर करून रंगत आणली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पायल संगीत नृत्यालयाच्या हितैष्णा संजय पवार यांनी भावपूर्ण मुद्राभिनयाद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर नक्षत्रा दिगंबर पाटील, श्रावणी मुकेश बडगुजर, उर्विजा जितेंद्र देवरे, स्वरा महेंद्र पाटील या समुहाने ‘छोटी छोटी मैय्या’ या गीतावर कथ्थक नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली.
राजरत्न रंजीत पार्थे, फाल्गुनी निलेश सूर्यवंशी, श्रावणी सचिन देशपांडे या समुहाने ‘अच्युतम् केशवम्’ या गीतावर बहारदार गायन सादर करून रंगत आणली. आंशिका ज्ञानेश्वर पवार व काव्या रूपेश नेवे या नृत्यांगनांनी कथ्थक सादर केले. ‘मेरे बाके बिहारीलाल’ गीतावर निमिशा संकेत नेवे तनिष्का पंकज खंडाळे, विधी विशाल शर्मा, राशी विशाल शर्मा या समुहाने कथ्थक सादर करून रसिकांची प्रशंसा मिळविली.
“छोटी छोटी मैय्या’ या भावपूर्ण गीतावर निमिशा संकेत नेवे, अवनी पवन शर्मा, विधी अनिल पटले या समुहाने गायन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ‘हरी सुंदरनंद मुकुंदा’ गीतावर अनुप्रीया अभय बापट हिचे गायन लक्षवेधी ठरले. ‘अधरम् मधुरम्’ या भावगीतावर रेवती देवीदास चौधरी, आयुषी यशवंत पाटील, विशाखा चंद्रकांत सपकाळे या समुहाने कथ्थक सादर केले. ‘अच्युतम् केशवम्’ भावगीतावर मिताली संजय कोलते, देवीका गिरीश पाटील, अनुश्री चेतन संघवी, समृध्दी गोपाल मालुसरे, अबोली दर्शन काळे यांनी संदर असे कथ्थक सादर केले.
नाटिका सादर करून उपस्थितांची जिंकली मने
पायल नृत्यालयाच्या सर्वेसर्वा हितैष्णा संजय पवार, सृष्टी योगेश काळुंखे, संस्कृती कृष्णा श्रीवास्तव या समुहाने नृत्य नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शन हितैष्णा पवार व कुशराजे संजय पवार यांचे होते. सर्व समुहाला हार्मोनियमवर अनिकेत शिंदे, तबल्यावर हितैष्णा पवार, अभय वनकर, दक्ष कापुरे, हिमांशू वाणी, अनिकेत बक्षी यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाला कल्पेश शहा, भुवनेश्वर सिंह, रमा सिंह, कृष्णा पवार, योगेश शुक्ल, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन संस्कृती श्रीवास्तवने केले.