Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»हरिहरेश्वरची बोट ओमान सिक्युरिटीची, एटीएसचे पथक दाखल
    क्राईम

    हरिहरेश्वरची बोट ओमान सिक्युरिटीची, एटीएसचे पथक दाखल

    SaimatBy SaimatAugust 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

    रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट ओमान सिक्युरिटीची असल्याची माहिती हाती आली आहे. आज दुपारी हरिहरेश्वर समुद्राच्या किनारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली. या बोटीत कुणीही व्यक्ती नसल्याने आणखीच भीती व्यक्त करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला. आज विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एटीएसच्या चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईसह राज्यातील समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या बातमीचे 10 अपडेस् पुढीलप्रमाणे-

    1. रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वरमध्ये गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी संशयास्पद बोट सापडली. मच्छिमारांना ही बोट पहिल्यांदा दिसली. एक स्पीड बोट आणि त्यात कोणीही व्यक्ती नव्हती.
    2.  मच्छिमारांनी याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली.
    3.  प्रशासनाची यंत्रणा समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली. या संशयास्पद बोटीत एके 47 रायफली आणि काही काडतूसं सापडली.
    4.  शस्त्रास्त्र सापडल्याने रायगड जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावरील गावांनाही अलर्ट देण्यात आला.
    5.  रायगडमध्ये विविध परिसरात नाकाबंदी करण्यात आली.  या बोटीचा तपास करण्यासाठी एटीएसचं एक पथकदेखील हरिहरेश्वरच्या दिशेने रवाना झाले.
    6.  या बोटीवर सापडलेल्या शस्त्रास्त्रावर लावण्यात आलेल्या स्टिकरच्या माध्यमातून ती ओमानच्या एका कंपनीची असल्याचे उघडकीस आले.
    7.  नेपच्यून सिक्युरिटी ही ओमान मधील समुद्र किनाऱ्यावर गस्त घालणारी कंपनी आहे. या कंपनीची बोट असल्याचे निदर्शनास आले.
    8.  सुरक्षा अधिकाऱ्यांनी ओमानच्या या कंपनीशी थेट संपर्क साधला. कंपनीने ही बोट आमचीच असल्याचे मान्य केले.
    9.  जून महिन्यात ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या. त्यांचे रेस्क्यू ऑपरेशनदेखील झाले होते. यापैकीच ही एक बोट असू शकते, अशीदेखील शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
    10.  विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा यंत्रणांना सखोल चौकशीचे आदेश दिले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.