साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
येथील इनरव्हील क्लबतर्फे तेजज्ञान फाउंडेशन संस्थेमार्फत येथील महिला मंडळ हाॅलमध्ये ‘हॅप्पीथाॅटस’ म्हणजेच चांगले विचार विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरश्रीजी यांचे विचार खूप प्रेरणादायी असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता आले आहेत. तेजज्ञान फाऊंडेशन हॅपी थॉट्स आपल्या जीवनातील मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक चार प्रमुख तत्त्वांवर काम करतात. येथे ध्यानचेही महत्त्व सांगितले.
ध्यान म्हणजे मनाला शांत करून एकाग्रता साधण्याची प्रक्रिया. त्यामुळे तणाव कमी होतो, लक्ष केंद्रित होते आणि आत्म जाणीव वाढते. पॉझिटिव्ह विचार म्हणजे आशावादी दृष्टिकोन बाळगणे आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे आत्मविश्वास वाढवते, नैराश्य कमी करते आणि जीवनात सकारात्मकता आणते. एकत्रितपणे, मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह विचार हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी साधने आहेत. यावेळी प्रेसिडेंट डाॅ.सुनीता पवार, संगिता नागदेव, सुनीता भोसले, कल्पना महाजन व क्लब मेंबर उपस्थित होते.