‘त्या’ हाणामारी प्रकरणी टवाळखोरांवर गुन्हा दाखल

0
45

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील पद्मालय विश्रामगृह येथील हॉटेलजवळ काहीही कारण नसताना ७ ते ८ जण हातात लोखंडे व तीक्ष्ण हत्यार घेऊन एकमेकांशी वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे जवळ असलेल्या हॉटेल रंगोली समोर मंगळवारी २८ जून रोजी दुपारी ३ वाजता काही कारण नसताना गणेश रवींद्र सोनवणे, अक्षय पाटील, गणेश उर्फ जग्गू सोनवणे, साबू, अण्णा राठोड, गौरव गायकवाड, दीपक सुकलाल सोनवणे, सुनील रसाल राठोड यांच्यासह इतर सात ते आठ अज्ञात व्यक्ती एकमेकांमध्ये काही कारण नसताना हातात लोखंडी व तिक्ष्ण हत्यार घेऊन वाद घालत होते.

दरम्यान शहर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेऊन हा वाद मिटवला. दरम्यान याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे प्रवेश प्रकाश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहोकॉ विजय निकम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here