आमडदे शाळेत ह.भ.प. रूपालीताई सवणे परतुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात

0
12

आमडदे शाळेत ह.भ.प. रूपालीताई सवणे परतुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात

साईमत/भडगाव/प्रतिनिधी :

येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे यांच्यावतीने संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिक्षण महर्षी प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील प्रांगणात महाराष्ट्रातील महिला किर्तनकार ह.भ.प.रूपालीताई सवणे परतुरकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता शारदा माता, कर्मवीर तात्या बाबा कै.ताई आजी.कै.सौ.साधनाताई पाटील, कै.युवराज दादा पाटील, कै.अशोक अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ.पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी मानद सचिव तथा कै.दीनानाथ दूध उत्पादक सोसायटी आमडदे येथील चेअरमन जगदीश पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, रमेश पाटील, जयवंतराव बागल, आबाजी पाटील, नारायण पाटील, जयवंत पाटील, लीलाधर पाटील, किशोर पाटील, दिनानाथ पाटील, संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे, प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील, पर्यवेक्षक अमृत देशमुख, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल भडगाव येथील प्रशासकीय अधिकारी संजू सूर्यवंशी यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांमधील प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक मान्यवर उपस्थित होते

कीर्तनातून ह.भ.प.रूपालीताई सवणे परतुरकर यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील भजने व भक्ती गीते म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. भारतीय संस्कृतीविषयी विविध उदाहरणे सांगून संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. मुलींनी धाडसी बनावे. तरुण पिढीने व्यसनाच्या आधीन जाऊ नये. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवावी, अशी अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन

कीर्तनासाठी गायक म्हणून सागर महाराज सोमापूरकर, तबलावादक भाऊसाहेब महाराज, मयूर महाराज वडनेर खाकुर्डी तसेच श्रीराम भजनी मंडळ अंजनविहीरे, आमडदे येथील भजनी मंडळ यांनी उत्तमरित्या टाळ व मृदुंगाची साथ दिली. तसेच विशेष म्हणजे कीर्तनासाठी परिसरातून प्रचंड गर्दी आल्याने उत्कृष्टरित्या समाज प्रबोधन करण्यात आले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here