साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातून अवैधरित्या गुटखा व पानमसाला यांची वाहतूक करणारी कार चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडली आहे. त्यात कार व गुटख्यासह ४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चाळीसगाव शहरातून अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पथकाने कारवाई करत कार (क्र.एमएच ४३ एक्स ५२५६) ही अडविली. त्यानंतर तिची चौकशी केल्यावर त्यात १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला मिळून आला. दरम्यान पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कारचालक याला अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.