साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव हे गुटखा विक्रीचे केंद्र असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली आहे. चाळीसगावातील गोदामांमध्ये गुटखा साठवून तो देशभर पाठविला जातो. गुटखा विक्रीतून चाळीसगावात करोडो रुपयांचा ‘टर्न ओव्हर’ असल्याचे चर्चिले जात आहे. येथे वारंवार धाडी टाकून गुटखा जप्त केला जात असल्यामुळे त्यात असल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.