विविध कार्यक्रमांसह विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरापासून जवळील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम, पुरुषोत्तम पाटील नगर, स्वामी समर्थ शाळेच्या पुढील स्वामी समर्थ केंद्राजवळ सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सव तसेच कल्पवृक्ष शिवमंदिर, स. स. दत्ता आप्पा महाराज पादुका मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा येत्या गुरुवारी, १० जुलै रोजी साजरा होणार आहे. यावेळी कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त १० जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वाजता पाद्यपूजन, अभिषेक दासबोध ग्रंथ पूजन, सत्संग नाम संकीर्तन सुनील जाखेटे (कृष्ण दास इस्कॉन परिवार), सकाळी ११ ते १ वाजता ह. भ. प. मयूर महाराज (ममुराबाद) यांचे प्रवचन, ज्येष्ठ माता-पित्यांचा सत्कार, वृक्षारोपण, महाआरती, पुष्पवृष्टी, प्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी ९१५६८४३२१४, ९०९६८७०१९७, ९४२३१८५२०५, ९७६७४८३०८६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आयोजकांनी सांगितले.
महोत्सवाचा लाभ घेण्याचे यांनी केले आवाहन
कार्यक्रमाचा समस्त प्रेमी, भाविक भक्त, शिष्य परिवाराने लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष कल्पना वरकड, सचिव जगदीश देवरे, सदस्य धनराज दयाराम सावदेकर, भागवत चौधरी, मनोज राजपूत, निर्मला देवरे, अनिल कातोरे यांनी केले आहे.