सोहळ्यात पाद्यपूजन अभिषेक, दासबोध ग्रंथाच्या वाचनासह विविध कार्यक्रमांचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरापासून जवळील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम पुरुषोत्तम पाटील नगरात सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे कल्पवृक्ष शिवमंदिरात गुरुपाैर्णिमेच्या दिवशी दत्ता आप्पा महाराज पादुका मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पाद्यपूजन अभिषेक, दासबोध ग्रंथ वाचन, गुरुपूजन नामसंकीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रभु सुनील जाखेटे (कृष्णदास) यांचे डी. के. चोपडे यांनी स्वागत केले. तसेच ह.भ.प. मयूर महाराज जावळे यांचे स्वागत धनराज सावदेकर यांनी केले.
यावेळी प्रभु सुनील जाखेटे इस्कॉन परिवाराने सुश्राव्य भजन तसेच हरीनामाचे जीवनात असलेले महत्त्व गीता भागवतमधील अनेक उदाहरण देवून पटवून दिले. आजच्या पवित्र दिनी हरीनामाचा संकल्प करू, असे भाविकांना सांगितले. तसेच ह.भ.प. मयूर महाराज जावळे (ममुराबाद) यांनी गुरुपौर्णिमेचे महात्म्य, गुरु भक्ती व गुरु शिष्य संबंध कसे असावे, याबाबत अनेक सोदाहरणासह दाखले दिले. तसेच गुरुने आजच्या वर्तमान स्थितीतील शिष्याची व्यवस्था न बघता परिस्थितीनुसार मार्गदर्शन करून निर्भेळ, सत्य ज्ञानदान करणे गरजेचे आहे. वाट दाखविणारे असायला पाहिजे, वाट लावणाऱ्यांचा संग नको, याविषयी प्रवचन केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ माता-पिता यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व भाविकांना विविध प्रजातीचे वृक्षांचे वाटप करण्यात आले. महाआरतीसह भाविकांना प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला विजय ढाके, धनराज सावदेकर, भागवत चौधरी, अनिल कातोरे, दयाराम बागुल, भगवान पाटील, अविनाश चौधरी, अर्जुन अवचार, भागवत पाटील, केशव पेंटर, प्रदीप कोल्हे, प्रसाद पोतदार, यशवंत शेवाळे, कल्पेश नारखेडे, कल्पना वरकड, विद्या करे, निर्मला देवरे, लीला नारखेडे, चारुलता सावदेकर, कोकिळा नारखेडे, चंद्रकला चौधरी, विजया चोपडे, ज्ञानदा कोल्हे, मंगला पाटील,सुनीता पाटील, चंद्रकला जाधव, संगीता अवचार, सौ.गव्हाणे, कौशल्या आठरे, रेखा बागुल, मंगल नारखेडे, मिना सोनार, सरला सोनार, मंजुळा ठाकूर, लता सोनार, रेखा वायकोळे, पुष्पा झांबरे यांच्यासह साळवा, ममुराबाद, आव्हाणेसह परिसरातील शिष्य परिवार, भाविक उपस्थित होते.
मंदिरावरील कळसाच्या बांधकामासाठी केले मदतीचे आवाहन
कार्यक्रमासाठी मनोज राजपूत, धनराज सावदेकर परिवार, जे. के. पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन तसेच संचालन, आगामी काळात लवकरात लवकर मंदिरावरील कळसाच्या बांधकामासाठी स्वेच्छेनुसार करण्याचे आवाहन सचिव जगदीश देवरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सुनील सोनार, अनिल कातोरे, दयाराम बागुल यांनी परिश्रम घेतले.