नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयात ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव उपस्थित होते.
व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम, प्रा.सुनील निकम, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, डॉ. उज्ज्वला नन्नवरे, डॉ.विजय लकवाल उपस्थित होते.
यावेळी अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. अधिसभा सदस्य प्रा. सुनील निकम यांनी ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ या विषयीची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली. स्वच्छतेचा संदेश प्रतिज्ञा मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला आणि स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश दिला. प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वच्छता मोहिमेत मनापासून सहभागी होऊ या आणि स्वच्छता हीच सेवा मानू या, असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. आर.जाधव,उपप्राचार्य डॉ.उज्ज्वल मगर, डॉ.जी.डी. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ.आर.पी.निकम, प्रा.के.पी.रामेश्वरकर, डॉ.उज्ज्वला नन्नवरे, डॉ.विजय लकवाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हर्षदा चौधरी, पूजा माळी हिने पाहुण्यांचा परिचय तर डॉ. विजय लकवाल यांनी आभार मानले.