‘रॅगिंग विरोधी कायद्या’वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
45

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ निमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती आणि नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवळी, ता. चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबीर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते.

शिबिरात रमेश पोतदार यांनी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ विषयावर दोन मराठी कविता सादर केल्या. सचिनकुमार दायमा यांनी ‘रॅगिंग विरोधी कायदा’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच एन.के.वाळके यांनी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या युवाशक्तीविषयी माहिती दिली. यावेळी ४ थीची विद्यार्थिनी सपना पावरा हिने भारताचे संविधानाचे वाचन केले.

शिबिरात शाळेतील सतिष पाटील, तुषार खैरनार, डी.के.पवार, देवेश पवार यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन तथा प्रास्ताविक पी.के.पाटील तर स्वप्नील पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here